टीव्ही सेंटर येथील स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या केली इंटरनॅशनल स्कूलच्या एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
उन्हाने हैराण झालेला तरुण गुरुदेव सिंग वय 17 हा हनुमान नगर टीव्ही सेंटर येथील स्विमिंग पूल मध्ये गेला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला.
उंचावरून उडी घेतल्याने सदर घटना घडली. यावेळी तो पाण्यामध्ये शिरताच त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ही माहिती मिळताच तेथील उपस्थितांनी त्याला केएलई इस्पितळात दाखल केले.
मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. गुरुदेव हा कॅम्प येथील रहिवासी कमांडो ऑफिसर गुरुप्रीत सिंग यांचा मुलगा होता.