बेळगाव : फलोत्पादन खात्यातर्फे २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत सूक्ष्म ठिबक सिंचन विभागांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. सरकारची ही सुविधा सर्व स्तरातील शेतकऱ्यांना देण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. किमान पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी ४५ टक्के व लहान-अति लहान, अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना किमान दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत ९० टक्के आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दिव्यांग, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक शेतकऱ्यांना पात्रतेनुसार मदत देण्यात येईल. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील फलोत्पादन खाते कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा दूरवाणीवरून • संपर्क साधावा, असे आवाहन फलोत्पादन खाते उपसंचालकांनी कळविले आहे
ठिबक सिंचन विभागांला आर्थिक मदत
By Akshata Naik
Previous articleಇಂದೂ ಸಾವಿರ ದಾಟಿತು ಕೊರೋನಾ ಸೊಂಕೀತರ ಮೊತ್ತ
Next articleManjunath Swami felicitated by Dr Sarnobat