शांताई वृद्धाश्रममध्ये गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व नारायण कणबरकर यांच्यातर्फे शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून शांताई वृद्धाश्रमामध्ये बामणवाडी येथील 21 गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.
बामणवाडी ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पी,कार्याध्यक्ष विजय मोरे,आश्रमाचे सदस्य ॲलन मोरे, शरद मोरे, आत्माराम शेफ यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना अनुक्रमे गादी, ब्लँकेट आणि बकेट अशा स्वरूपातील साहित्य वाटप करण्यात आले. श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने सदर साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पी यांनी आश्रमाकडून आपल्या गावातील गरजू कुटुंबांना देण्यात आलेली मदत लाभदायक असून आश्रमासाठी आमच्या गावकऱ्यांतर्फे मदत देऊ असे मत व्यक्त केले. यावेळी संजय हणबर, महादेव पी,श्रीमंत पाटील,नितेश पाटील, नितेश गावडे, मारुती कणबरकर, शरद मोरे, मारिया मोरे,रेखा बाळेकुंद्री रेखा कणबरकर, मल्लप्रभा, वज्रा आदी तसेच आश्रमातील आश्रयीत उपस्थित होते.