गोल्फ कोर्स मैदानात आज पोलिसांनी शिरून बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्धार केला आहे.त्यामुळे गोल्फ कोर्स मैदान परिसरात पोलीस व वनखात्याची टीम बिबट्या शोधाण्यासाठी मोठी मोहीम सुरु ठेवली आहे.
जवळपास 250 एकर गोल्फ कोर्स परिसर पिंजून काढण्यात येत आहे. बिबट्या नजरेस पडावा याकरिता जंगल परिसरात फटाके वाजविण्यात येत आहेत.
आज चार च्या सुमारास वनखाते आणि पोलीस खात्याकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असून सर्वजण एकत्रितपणे गोल्फ कोर्स मैदान परिसरात शिरले आहेत.
या ठिकाणी पत्रकारांना देखील पोलिसांनी आत शिरण्याची मुभा दिली होती. मात्र या ठिकाणी गोल्फ कोर्स मैदानात निर्माण झालेली भीती पाहता पोलिसांनी वन खात्यांनी पत्रकारांना देखील पुढे जाण्यास मनाई केली आहे
तसेच लवकरच बिबट्याला पकडण्यात वनखात्याने पोलीस खाते यशस्वी होतील असा विश्वास देखील नागरिकांनी व्यक्त केला आहे.