खादरवाडी येथील खादरवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींकरिता आरोग्य विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिर रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल वतीने घेण्यात आले.
यावेळी या शिबिरात विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दरम्यान घ्यावयाची दक्षता या संदर्भातील मौलिक मार्गदर्शन तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले.
तसेच यावेळी विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
यावेळी या उपक्रमाकरिता डॉ अनन्या शिंदे अंजली गरग मनीषा आळवणी यांनी पुढाकार घेतला होता तसेच शाळेच्या व्यवस्थापनाच्या वतीने उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.