गोवावेस येथील व्यापारी संकुल धोकादायक असल्याचे सांगून महानगर पालिकेने नोटीस बजावली आहे. पंधरा दिवसाच्या आत सर्व दुकाने रिकामी करा ही इमारत पाडवण्यात येणार आहे. अशा प्रकारची नोटीस आल्यानंतर व्यापारी संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.
तीस वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत धोकादायक कशी बनते ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती चौकशी करू असे आश्वासन दिले आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने नोटीस आल्यानंतर व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी योग्य ती चौकशी करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.