गांधीनगर येथील खाजगी भाजी मार्केट च्या विरोधात एपीएमसी भाजी मार्केट मध्ये दुकानदारांनी आंदोलन छेडले जोपर्यंत त्या खाजगी भाजी मार्केट चा परवाना रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी यावेळी केला.
येथील जय किसान होलसेल भाजी मार्केट ला गेल्या कित्येक दिवसांपासून विरोध करण्यात येत आहे मात्र याबाबत म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांनी आणखीन तीव्र आंदोलन केले आहे. त्यामुळे जय किसान चे विरोधात भारतीय कृषक समाजाचे राजाध्यक्ष शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी आजपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांवरील आणि व्यापाऱ्यांवर अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धार मोदगी यांनी केला आहे.