वृद्ध दाम्पत्यांना रस्त्यामध्ये अडवून चोरी केल्याची घटना गणेशपूर भागात घडली आहे. यावेळी चोरट्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांना रस्त्यात अडवले. आणि गणपत पाटील यांच्या पत्नी कडून अडीज तोळे सोन्याचे गंठण आणि श्रीमंत हार जबरदस्तीने काढून घेऊन रुमाल मध्ये ठेवतो असे सांगून तेथून पलायन केले. कोरवी गल्ली जुने बेळगाव येथील हे दाम्पत्य लग्नासाठी बेळगुंदी येथे जात होते .यावेळी गणेशपूर मध्ये त्यांना अडवून त्यांच्याकडून दागिने लंपास करण्यात आले .यावेळी आपल्याकडून फसवणूक झाली हे लक्षात येताच सदर महिलेने आणि वृद्ध दांपत्याने त्या ठिकाणी आरडाओरड सुरू केली. आणि तेथील स्थानिक नागरिकांना जमविले.सदर घटनेची नोंद वृद्ध दाम्पत्यांनी पोलीस स्थानकात केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.
भरदिवसा वृद्ध दाम्पत्यांना लुटले
By Akshata Naik

Previous articleहिजाब विरोधात आंदोलन
Next articleमोदगी यांचा आमरण उपोषणाचा निर्धार