- म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आता अंतिम टप्प्यात आली असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे. मंगळवार दि. 2 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ मजगाव गावच्या वेशीतील विठ्ठल रखमाई येथून होईल त्यानंतर मजगावातील सर्व गल्ल्या फिरून जानेश्वर नगर, कलमेश्वर नगर, रोहिदास कालनी, रायण्णा नगर, राजाराम नगर, देवेंद्र नगर, महावीर नगर, ब्रम्हनगर परिसर फिरून सांगता झाली .
पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
बुधवारी भाग्यनगरात
- म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 3 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ अनगोल नाका येथून चिदंबर नगर येथून भाग्यनगरमधील सर्व क्रास फिरून सांगता होईल.
पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.