कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन निर्णय मंडळाने काही दिवसांपूर्वीच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या तसेच गैरहजर राहिल्याने पुन्हा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. २२ मे ते २ जून या कालावधीत पुरवणी परीक्षा होणार आहे. यासंबंधीचे अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. परीक्षेचे वेळापत्रक https://kseab.karnataka.gov. in या वेबसाईटवरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.