सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था देशभरामध्ये हिंदू राष्ट्र जागृती अभियान राबवत आहे. वर्ष 2017 पासून या अभियानांतर्गत हिंदू समाजात हिंदू राष्ट्र आणि आदर्श राष्ट्र उभारणी विषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा मध्ये ठीक ठिकाणी मंदिरामध्ये साकडे, मंदिर स्वच्छता आणि साधना प्रवचन याचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत बेळगाव गावभागात राजहंस, नदिहल्ली, आणि शेडेगाली इत्यादी ठिकाणी मंदिराची स्वच्छता करून, हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. यावेळी देवतेच्या चरणी भारतात लवकरात लवकर हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावी तसेच विश्व कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. हिंदूंच्या मनात हिंदू राष्ट्र स्थापनेचा विचार वारंवार रुजवणारे सच्चिदानंद परब्रम्ह डॉक्टर जयंत बाळाजी आठवले तसेच हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अध्यात्मिक बळ देणारे संत महंत यांनाही उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, सनातन प्रभातचे वाचक आणि सनातन संस्थेचे साधक इत्यादी उपस्थित होते.
आपला नम्र,
श्री सुधीर हेरेकर.
समन्वयक,
हिंदू जनजागृती समिती, बेळगाव.
(098458 37423)