दिनांक ०८/०२/२०२२ रोजी मच्छे येथे परिवहन मंडळाच्या बस ला विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत होते. या संदर्भात म. ए. युवा समिती ने हुबळी च्या परिवहन महामंडळ कडे ट्विटर द्वारे तक्रार करून अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी केली होती आणि कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.
युवा समिती च्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, लांब पल्ल्याच्या बसेस बस थांब्यावर थांबत नाही आणि स्थानिक बसेस च्या अनियमित सेवा मुळे बस थांब्यावर विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत थांबावे लागते, आणि मिळेल त्या बस ने जीव धोक्यात घालून बसेस ना लटकून कॉलेज ला पोहचावे लागते.
काल दिनाक १०/०२/२०२२ रोजी परिवहन मंडळाकडून कोणत्या वेळेत आपणास बसेस हव्या आहेत आम्ही बस ची आणखीन एक फेरी वाढवून देऊ अशी माहिती परिवहन मंडळाने म. ए. युवा समिती ला दिली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ने देसूर, लक्ष्मी नगर व मच्छे येथील थांब्यावर सकाळी ०७:३० ते १० पर्यंत आणि संध्याकाळी ४ ते ६ पर्यंत तासाला एक वाढीव फेरी आणि अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी केली तसेच लांब पल्ल्याच्या बसेस ना वरील थांब्यावर विद्यार्थ्यां साठी थांबण्याची सूचना करावी अशी मागणी केली आहे. याबाबत बेळगाव च्या परिवहन कार्यालयाला निर्देश दिले जातील अशी माहिती हुबळी येथील व्यवस्थापकांनी दिली