पुष्पलता दामोदर भोसले राहणार बेळगाव या रुग्णाला एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत. मदतीचा UTR पत्र त्यांच्या नातेवाईकांना सोपवताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री रमाकांत दादा कोंडुस्कर , जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी , महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर ,श्रीनाथ पवार आधी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सहायता निधीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रमुख्याने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्य प्रमुख श्री मंगेश चिवटे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळींचे भोसले परिवाराच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त केले.
या योजनेची पाठपुरावा करून ज्यांनी ही सीमा भागात अंमलबजावणी करण्याकरिता सिंहाचा वाटा घेतले ते श्री रमाकांत दादा यांनी पुन्हा एकदा जनतेला आव्हान केला आहे की गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा.