No menu items!
Thursday, August 28, 2025

आमदार अभय पाटील यांचा सत्कार

Must read

बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो व आबा स्पोर्ट्स क्लब तर्फे बेळगाव दक्षिण चे आमदार अभय पाटील साहेब यांचा भव्य सत्कार करण्यात आला नुकताच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात देशातील व बेळगांव जिल्हातील क्रीडापट्टुचे नाव व त्यांच्या समस्या तसेच बेळगाव जिल्हासाठी मोठे क्रिंडागण (स्टेडियम ) व्हावे या विषयावर सरकारला प्रश्न विचारून सर्व खेळाडू व खेळाना प्रोत्साहान द्यावे क्रीडापट्टूना भरपुर मदत अनुदान देण्यात यावे अशी सूचना सरकारला केली. आतापर्यंत झालेल्या अनेक अधिवेशनात खेळ व खेळाडू साठी चर्चा झालीच नाही किंवा कुणी हा विषय विधान सभा अध्यक्ष समोर ठेवला नाही. खेळाडूचा हा मुद्दा आमदार अभय पाटील यांनी उचलुन धरून बेळगावातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे म्हणून त्यांचा हा सत्कार करण्यात आला. स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदार अभय पाटील यांचा भव्य सत्कार गोवावेस स्केटिंग रिंकवर करण्यात आला यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण,नगरसेवक नितीन जाधव, गिरीष धोंगडी, मंगेश पवार अभिजित जवळकर,श्रीशेल कांबळे, गीता सुतार,सरिता पाटील, वाणी जोशी, नंदू मिरजकर ,विनायक कामकर, सारंग राघोचे,विनोद भागवत, बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक आबा स्पोर्ट्स क्लब चे स्विमर्स व पालक व इतर सर्वजण उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित पाटील, विजय नाईक, शिवा मोहिते, विठ्ठल गगने ,योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, ऋषीकेश पसारे, सक्षम जाधव,गणेश दड्डीकर,सागर चौगुले,सोहम हिंडलगेकर,राज कदम व ईतरानी सहकार्य केले

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!