जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन्स यांच्यावतीने जयंत सप्ताह निमित्त शहापूर येथील आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर माध्यमिक विभागांच्या मुला मुलींसाठी कबड्डी व प्राथमिक विभागातील मुला-मुलींसाठी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन्सचे अध्यक्ष श्री यल्लाप्पा पाटील सर उपस्थित होते खो-खो स्पर्धांचे उद्घाटन विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव नंदीहळी यांच्या हस्ते करण्यात आले तर कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन इव्हेंट प्रमुख आकाश लाटुकर व समर्थ बैलुर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये शहापूर टिळकवाडी विभागातील बऱ्याच शाळांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये माध्यमिक विभाग मुलांच्या कबड्डी स्पर्धेत गोमटेश हायस्कूल प्रथम क्रमांक तर एस के इ शानबाग हायस्कूल द्वितीय क्रमांक माध्यमिक मुलींच्या गटात पंडित नेहरू हायस्कूल प्रथम क्रमांक तर धामणे हायस्कूल द्वितीय क्रमांक प्राथमिक विभागात मुलांच्या खो-खो स्पर्धेत आदर्श मराठी विद्या मंदिर प्रथम क्रमांक, व द्वितीय क्रमांक पटकाविला तर मुलींच्या खो-खो स्पर्धेत आदर्श मराठी विद्या मंदिर प्राथमिक शाळांच्या मुलींनी प्रथम तर मुक्तांगण प्राथमिक शाळा द्वितीय क्रमांक पटकाविला विजयी स्पर्धक संघांना आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले यावेळी जेंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन्सचे लक्ष्मण शिंदे मुकुंद महागावकर समर्थ बैलूर प्रकाश तांजी, राहुल बेलवलकर मधु बेळगावकर ,शिवराज पाटील, अरुण काळे, लक्ष्मण शिंदे ,संजय पाटील, प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी केले तर आभार मुकुंद महागावकर यांनी केले
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन्स तर्फे कबड्डी व खो-खो स्पर्धा
