मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन कर्नाटकआयोजित मिशन ऑलिम्पिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2025
(रामनाथ मंगल कार्यालय अनगोळ-बेळगाव) येथे विविध खेळाच्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून 2017 साल पासून मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया ही संघटना काम करत आहे,
भारतातून अनेक राज्यतून विविध खेळांच्या माध्यमातून या संघटनेचे काम चालू आहे.
मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया ही संघटना Ministry of Corporate affairs Government of India च्या अंडर नोंदणी कृत आहे कंपनी कायदा सेक्शन नंबर 6 या कायद्यांतर्गत अधिकारास पात्र आहे.
या संघटनेची खेलो इंडिया, फिट इंडिया नोंदणी झाली आहे, Ministry of sports and youth affairs, Gov. Of india ही देखील नोंदणी झाले आहे. त्याचबरोबर संघटनेचे आय.एस.ओ., निती आयोग, TAFISA या महत्त्वाच्या नोंदणी आहेत. तसेच International Olympic sport organisation committee या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अखत्यारित भारतामध्ये काम करत आहे.
संस्थेचे 12A, 80G, CSR रजिस्ट्रेशन असून प्रशासकीय सर्व डॉक्युमेंट पूर्ण आहेत.
संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाचं एक चांगलं व्यासपीठ मिळणं आणि त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
क्रीडा स्पर्धा बरोबरच क्रीडा क्षेत्रातील आणि उपक्रम संघटनेच्या वतीने राबवले जातात.
दिनांक 25 व 26 ऑक्टोबर रामनाथ मंगल कार्यालय बेळगाव येथे होत असलेल्या आखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत पैलवान,वस्ताद व कुस्तीप्रेमी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.