गावठी दारू विकणाऱ्या होनगा येथील एका इसमाला काकती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी जुमनाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर औद्योगिक वसाहत परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
भैरू आप्पय्या नाईक (वय ५०)
राहणार होनगा असे त्याचे नाव आहे. काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठद सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याजवळून सुमारे १५०० रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. भैरूवर कर्नाटक अबकारी कायदा कलम ३२ व ३४ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.