बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी वैभव नगरातील बसव कॉलनी येथे जनता दरबाराचे आयोजन करून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या दरम्यान त्यांनी परिसरातील विविध नागरी अडचणी, मूलभूत सुविधा आणि विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या.
आमदार सेट यांनी स्वतः नागरिकांसोबत परिसरातील रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर सार्वजनिक सुविधा पाहणी करून आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांनी मांडलेल्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या वेळी आमदारांसोबत नगरसेवक, स्थानिक नेते आणि नगरपालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परिसरातील प्रलंबित आणि सुरु असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेत त्यांनी नियोजित प्रकल्पांचा आढावा घेतला.
आमदार आसिफ (राजू) सेट यांनी सांगितले की, “जनता दरबाराच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधल्याने त्यांच्या अडचणी व अपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजतात. पारदर्शक आणि उत्तरदायी शासन हीच आमची प्राथमिकता आहे.”
आमदार आसिफ (राजू) सेठ यांचा जनता दरबार



