मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3- 30वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे त्यादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दल बैठकीत विचार करण्यात येणार आहे या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.



