नंदीहळळीची प्रियांका पी. कोलकार ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीने पॉलिटिकल सायन्स या विषयात सर्वाधिक गुण घेऊन विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदक मिळविले. याबद्दल तिचा राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 9 वा वार्षिक दिक्षांत समारंभ सुवर्ण विधानसौध येथे पार पडला. या समारंभात विद्यापीठाचे कुलपती व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते प्रियांका कोलकार हिला सुवर्णपदक व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर सहकुलगुरू आणि उच्च शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व जैविक तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एम. रामचंद्र गौड, कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, प्रा. विरनगौडा बी. पाटील, वित्त अधिकारी प्रा. डी. एन. पाटील आदी उपस्थित होते.
प्रियांका कोलकार ही एपीएमसीचे माजी सदस्य आणि नंदीहळळी येथील रहिवाशी परशुराम कोलकार यांची मुलगी आहे.