भारतीय रोलर स्केटिंग महासंघ आयोजित 62 वी राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2024 या मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता
5 ते 15 डिसेंबर 2024 या दरम्यान या स्पर्धा म्हैसूर, बेंगळुरू आणि कोइंमबतूर येथे आयोजित केल्या होत्या 30 राज्यातून एकूण 4500 पेक्षा जास्त स्केटरनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटर्सनी 2 सुवर्ण, 8 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 11 पदके या स्पर्ध्ये मध्ये जिंकली
पदक विजेत्या स्केटरचे नाव
सई पाटील २ सुवर्ण
तीर्थ पाचापूर २ रौप्य
सिद्धार्थ काळे २ रौप्य
अथर्व हडपड १ कांस्य
देवेन व्ही बामणे १रौप्य
अनुष्का शंकरगौडा १ रौप्य
खुशी घोटीवरेकर १ रौप्य
शेफाली शंकरगौडा १ रौप्य
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे आणि विश्वनाथ येलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका स्केटिंग रिंक,केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे.