पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये तीन दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतानी झाली. यानंतर कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर विश्वभारत सेवा समिती बेळगाव संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन व ध्वजारोहण केले महालक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव करबंळकर यांच्या हस्ते झाले. नंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथसंंचालन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तदनंतर महाविद्यालयाच्या राज्यस्तरीय खेळाडूंनी क्रीडा ज्योत मैदानवर फिरवून पाहुण्यांच्या हस्ते सुपूर्द केली. यानंतर तक्ष शहा यानी खेळामध्ये खेळाडू वृत्तीचे शपथ विद्यार्थ्यांना दिली. नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायामासोबत खेळ ही खूप महत्त्वाचे आहेत. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा ही त्यांनी दिल्या. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी यांनी, शरीर आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नेहमी सकाळी लवकर उठून चालले पाहिजेत, योगा केला पाहिजेत, व फास्ट फूड जंक फूड पासून दूर राहिले पाहिजेत व ते खाऊ नये. असे त्यांनी सांगितले व मुलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले स्वातंत्र्यसैनिक संघाचे सचिव व खजिनदार विवेकानंद पोटे सदस्य किरण बेकवाड, महालक्ष्मी सोसायटीचे मॅनेजर जी. जी. पाखरे, तसेच संस्थेचे संचालक एस. एम. साखळकर, गजानन घुग्रेटकर, यल्लाप्पा कुकडोळकर, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यासाठी मोलाचे सहकार्य महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक देवकुमार मंगनाकर यांचे लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मुतगेकर आणि मयूर नागेनहट्टी व आभार प्रदर्शन सुरज हत्यालगे यांनी केले.