No menu items!
Sunday, February 23, 2025

दुचाकीला कारने पाठीमागून ठोकल्याने दोघे गंभीर जखमी.खानापूर अनमोड मार्गावरील नेरसे कत्री जवळील घटना

Must read

खानापूर ; खानापूर-अनमोड मार्गावरील नेरसे कत्री जवळ, कारने दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने, झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी, घडली आहे. या अपघातात लकमान्ना सन्नाप्पा हणबर (वय 65,) मुडगई, आणि मल्लव्वा महेश गावडे (वय 45) जगलबेट, तालुका जोयडा, हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खानापूर येथील सरकारी रुग्णालयांत प्रथमोपचार करून, अधिक उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, जखमी लकमान्ना आणि मल्लवा हे अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळी नेरसे फाट्यावर मागून आलेल्या (एमएच 02 जीपी 8477) या कारने, मागून ठोकर दिली. यात दुचाकी व लकमांन्ना आणि मल्लवा रस्त्याच्या बाजुला असलेल्या चरीत पडले. त्यामुळे त्यांना जबर मार बसला आहे. लकमान्ना यांच्या पायाला तर मल्लव्वा यांच्या हाताला जबर मार बसला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला आहे. त्यामुळे त्यांना पुढील अधिक उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!