बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे, पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे यामध्ये पुढारी वृत्तपत्राचे उपसंपादक संजय सूर्यवंशी ,न्यूज 18 बेळगावचे जिल्हा विशेष प्रतिनिधी चंद्रकांत सुगंधी ,इन न्यूज मराठी वाहिनीच्या उपसंपादिका नीलिमा लोहार आणि कन्नड न्यूज चॅनलच्या अँकर लावन्या अनिगोळ यांची या पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.शनिवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर हिंदवाडी बेळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरित केले जाणार आहेत .
बेळगाव सार्वजनिक वाचनालयातर्फे, पत्रकार पुरस्कार जाहीर
