बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावात आज शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याला साप चावल्याने मृत्यू झाला आहे.
रवींद्र कांबळे वय (३८) या शेतकऱ्याला साप चावल्याने मृत्यू झाला. आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेलेला रवींद्र बटाटे लावत असताना बटाट्याच्या वेलीखाली साप आढळला. वेली ओढत असताना सापाने शेतकऱ्याचा हाताला दोनदा डंस मारला.त्यानंतर रवींद्रला ताबडतोब बेळगावजल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
सापाने चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
