मृतदेहाला पाण्यातून बाहेर कडून शोध मोहीम सूरु
मृत व्यक्ती बेळगावातील भांदूर गल्ली येथील रहिवासी
बेळगावातील कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस आज मृतदेह तरंगताना आढळून आला होता .त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यांनी मृतदेहाला पाण्यातून बाहेर कडून शोध मोहीम हाती घेतली आहे.
सचिन मनोहर पाटील वय 47 असे मृत व्यक्तीचे नाव आहे तो बेळगावातील भांदूर गल्ली येथील रहिवासी आहे .सचिन हा भांडी दुकानात काम करत होता अशी माहिती मिळाली आहे ,सचिन यांनी आत्महत्या केली का तो तोल जाऊन पडला किंवा त्याच्या सोबत घातपात झाला याचा पोलीस तपास करत आहेत .खडेबाजार पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय