बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापुर मधील अडसिद्धेश्वर मठात एक नाट्यमय घटना घडली आहे. मठातील अडविसिद्धेश्वर स्वामींजी मठात एका महिलेसोबत अनैतिक कृत्य करत असल्याच्या आरोपां मुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री गावात स्वामीजी आपल्या मठात एका महिलेसोबत काही कृत्य करत असल्याचे आढळून आले. हा प्रकार ऐकल्यावर संतप्त गावकऱ्यांनी थेट मठा समोर येऊन जाब विचारला.
स्वामीजींनी त्या महिलेसोबत रंगेहात पकडण्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. युवकांनी ही माहिती गावकऱ्यातील प्रमुख नागरिकांपर्यंत पोहोचविली. काही वेळातच गावकरी मठाजवळ एकत्रित आले. आणि त्यांनी स्वामी आणि महिलेला एकत्रित पाहून संताप व्यक्त केला. त्यानंतर युवकांनी स्वामींचे खरडपट्टी काढली. याबाबतची माहिती मुडलगी पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. त्यानंतर स्वामीजी आणि गावकऱ्यांची बैठक झाली. यावेळी गावकर्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मठात राहून देण्याची जोरदार मागणी केली. स्थानिकांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर स्वामीजींना मठातून बाहेर काढण्यात आले. सदर घटना गावात चर्चेचा विषय बनली असून याबाबत तपास करत आहेत.