बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना अनेक सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी व्यत्यय येत आहे .यामुळे सर्व पत्रकारांना आरोग्य कार्डचे वितरण करण्यात यावे अशी मागणी यावेळी बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वृत्तपत्र क्षेत्रातील ठरविक पत्रकारांना आरोग्य कार्ड देण्यात आले आहे. मात्र इतर पत्रकार त्या सुविधेपासून वंचित आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच पत्रकारांना आरोग्य कार्ड मंजूर करावेत .तसेच इतर गोष्टीमध्ये ही सूट द्यावी. फक्त पत्रकार नाही तर छायाचित्रकारांना आरोग्य कार्ड वितरित करण्यात यावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .यावेळी बेळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि छायाचित्रकार जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याकरिता उपस्थित होते.