कडोली मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या दुसर्या रविवारी भरविण्यात येत आहे . 37 वे कडोली मराठी साहित्य संमेलन येत्या 13 मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राआनंद मेणसे राहणार आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध घातल्यामुळे बेळगाव परिसरातील मराठी साहित्य संमेलने होऊ शकली नाहीत पण आता निर्बंध शिथिल झाल्याने संमेलने आयोजित करण्यासाठी मराठी साहित्य संघ पुन्हा कामाला लागले आहेत .
संमेलनातील इतर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात आल्याचे संघाकडून कळविण्यात आले आहे.तरी या संमेलनांना सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .