No menu items!
Thursday, December 5, 2024

जोतिबा देवाच्या अश्वाचे निधन

Must read

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उन्मेष नामक अश्वाचे बुधवारी 4 वाजता निधन झाले ,सकाळपासून थकवा ,अशक्तपणा दिसून येत होता यासाठी देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैद्यकीय डॉक्टरना बोलावून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केलें मात्र दुपारी चार च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने या अश्वाचे निधन झाले.आणि देवाचा घोडा देवाघरी गेला.

उन्मेष या नाथांच्या अश्वाला हिम्मत बहादूर चव्हाण सरकार यांच्याकडून सन 2012 साली देण्यात आले होते. यावेळी साधारण नऊ महिन्याचा हा अश्व होता. आजअखेर दहा वर्षे नाथांच्या सेवेत घालवले होते .

निधनाचे वृत्त समजताच जोतिबा पुजारी ग्रामस्थ,भाविक यांच्यात हळहळ व्यक्त झाली .तसेच वृत्ताची बातमी झपाट्याने पसरताच डोंगरपरिसरात भाविक व नाथ भक्त यांनी धाव घेतली, यानंतर ग्रामस्थ ,देवस्थान समितीकडून ट्रॅक्टर फुलांनी सजवण्यात आला .

नाथांच्या अश्वाच्या अंतिम दर्शनासाठी लोकांचा जनसमुदाय लोटला होता. यानंतर मंदिर परिसरात प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्गस्थ करण्यात आले .यानंतर दक्षिण दरवाजा या ठिकाणी या अश्वाचे अंत्यविधी करण्यात आले .यावेळी केदार्लिंग देवस्थान समितीचे कर्मचारी ,पुजारी ,गावकरी प्रतिनिधी,ग्रामस्थ व भक्त उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!