चव्हाट गल्ली बेळगाव येथींल मराठी शाळा नं.5 येथे मराठी भाषा दिन व सेवानीवृती समारंभ असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून दिपक किल्लेकर उपस्थीत होते.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.प्रास्ताविक भाषणात व्ही.व्ही.पाटिल यानी कार्यक्रमाच उद्देश्य सांगून मान्यवरांचे स्वागत केले.त्यानंतर मराठी भाषा दिनानिमित्त शाळेच्या माजी विधार्थी संघटने च्या वतीने निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेतील विजेते कुमारी तनुजा वड्ड, पूनम रजपूत, संस्कृती हुदलीकर व संस्कृती लोंढे याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देवुन गौरवण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक के.आर. कडोलकर व सहशिक्षीका श्रीमती एल.आर.गवळी आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज निवृत झाले त्यानिमित्त शाळेच्या वतीने ,क्लस्टरच्या वतीने तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ, ग्रंथ व भेटवस्तू देऊन त्याना सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी आर.एस.मोरे, कडोलकर, दिपक किल्लेकर, श्रीमती गवळी व व्ही ए हसबे यानी आपल्या मनोगतामधून मराठी भाषेचा समृद्ध इतिहास सांगून मराठी भाषेच्या अभिवृदीसाठी आपण सर्वानी एकजुटीने प्रयन्त करण्याची आवश्यकता असल्याचे नमुद केले.
यावेळी विध्यार्थ्यानी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये शिवराज पाटील यांनी मराठी भाषेचा गोडवा गात उपस्थीत पालकवर्गाला मुलाना मराठी भाषेतून शिक्षण देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पोवार यानी केले तर आभार राजू कांबळे यांनी मानले.कार्यक्रमास एस.डी.एम.सि.चे अध्यक्ष अशोक अष्टेकर, इतर सदस्य, रवी नाईक, डॉ चंद्रकांत बेळगांवकर निवृत्त सुभेदार, व्ही ए हसबे मुख्याध्यापक सेंट्रल हायस्कूल, सर्व शिक्षकवृंद, प्रशिक्षणार्थी शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.