येथील सिद्धार्थ बोर्डिंग मधील घरे पावसामुळे मोडकळीस आली होती .त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन जीवन संघर्ष फाउंडेशनच्या वतीने येथील एका कुटुंबाला घर बांधून देण्याकरिता डॉक्टर गणपत पाटील यांनी मदत देऊ केली आहे.
चंद्रकांत हिरेमठ यांचे घर कोसळल्याने सदर कुटुंबीय उघड्यावर आले असून त्यांना घर बांधून देण्याकरिता डॉक्टर गणपत पाटील त्यांनी पुढाकार घेतला आहे.
याठिकाणी घर बांधण्याबरोबरच सिद्धार्थ बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांना मेस ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे .सदर बांधकाम विनामूल्य करून देण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर गणपत पाटील यांनी दिली असून याचा शुभारंभ उद्या शुक्रवार दिनांक 4 मार्च रोजी सिद्धार्थ बोर्डिंग मध्ये पार पडणार आहे.
तसेच सिद्धार्थ बोर्डिंग मध्ये गोशाळा गोबरगॅस याचीही बांधणी करून देण्यात येणार आहे.सिद्धार्थ बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांना सोईस्कर व्हावे याकरिता शौचालय बांधणी करून द्यावी याकरिता महानगर पालिकेच्या शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांची भेट घेतली .
यावेळी लक्ष्मी निपाणीकर यांनी सिद्धार्थ बोर्डिंग ला भेट देऊन आपल्या परीने जमेल तितकी मदत देऊ अशी ग्वाही दिली.
त्यामुळे याठिकाणी सुरू असणाऱ्या कामांमध्ये शौचालय आणि गोबरगॅस बांधून देण्याकरिता लक्ष्मी निपाणीकर यांचा खारीचा वाटा असणार आहे .