प्रा. अशोक आलगोंडी – एस जी पाटील पदवी पूर्व महाविद्यालायात मराठी भाषा दिन साजरा
भाषा आदान प्रदानाचे प्रमुख साधन असून मातृभाषेतून शिक्षणाने बौद्धिक विकास लवकर होतो. मराठी भाषा गौरव दिन निमित्त मराठीचा जागर करत असताना मराठी माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करायला हवा. मराठी भाषा समृद्ध आहे. ती सध्याच्या स्थितीत उपयोजित होते आहे. त्यामुळे मराठी विषय घेणाऱ्यांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. साहित्य, जाहिरात, मुद्रितशोधन अशा वेगवेगळ्या उपयोजित क्षेत्रात मराठी विषय घेऊन करियर करता येतं. मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार-प्रसार करणे हाच मराठी भाषेचा गौरव आहे. कारण भाषा संपली की त्यासोबत पूर्ण एक संस्कृती संपते. नव्या पिढीने आपल्या समृद्ध भाषेचे महत्व ओळखून मराठीच्या वैभवात भर पाडावी असे प्रतिपादन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले.
किणये येथील मराठा मंडळ संचलित एस जी पाटील पदवी पूर्व महाविद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून कागवाड शिवानंद महाविद्यायाचे प्रा अशोक आलगोंडी बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य आर पी गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने आणि मराठी अभिमान गीताने झाली. प्रास्ताविक मराठीचे प्रा. आर एम येळ्ळूरकर यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्रा. आर के ओउळकर आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी प्रा अशोक आलगोंडी यांचा प्रचार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रा एन आर धमाणेकर, प्रा एम डी खांडेकर, प्रा एम एस भोसले, प्रा ए एस अंगडी, एस डी नदाफ, डी एन कांग्राळकर, प्रा. ए के मराठी, व्ही के गावडे सह पदवी पूर्व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राची मोरे व नम्रता मोरे यांनी केले तर आभार प्रा. कल्पना गावडा यांनी मांडले