राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त रविवारी म्हणजे उद्या दिनांक 6 मार्च रोजी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे .
मराठी विभागातर्फे दरवर्षी भाषा दिनानिमित्त सृजन कवी संमेलन आयोजित करण्यात येत असते .बेळगाव परिसरातील ज्येष्ठ तसेच नवोदित कवींशी संवाद साधावा त्यांची मते जाणून घ्यावीत कवितांच्या विकासासाठी काय करता येईल याचे चिंतन करावे .यासाठी हे संमेलन होणार आहे .
यामध्ये तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन देखील करणार आहेत. त्यामुळे सर्व कवींनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठी विभाग प्रमुख डॉ विनोद गायकवाड यांनी केले आहे.