महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत धामणे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या मुलाना आणि इतर वर्गातील गरजू मुलांना युवा समितीच्या वतीने साहित्य वाटप केले जाते, मराठी प्रेमी शिक्षण प्रेमी या उपक्रमाला सढळ हस्ते मदत करत असतात.
धामणे येथे साहित्य वाटप करतेवेळी श्री भुजंग चव्हाण सर,घाडी टीचर, युवा समिती सहकारी हरीबसू धुळजी,प्रसाद पाटील,ओमकार पाटील,ज्योतिबा पाटील,सुशांत मजूकर,युवराज भातकांडे,सचिन मजूकर आदी उपस्थित होते. घाडी टीचर यांनी आभार व्यक्त केले.