प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते, असे म्हणतात. हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांच्या पत्नी भाग्यश्री सुरेंद्र अनगोळकर यांचे योगदान याच बाबतीत महत्त्वाची ठरते. 24तास समाजाच्या कार्यात राहणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांना विशेष साथ देणारी त्यांची पत्नी भाग्यश्री यांचा महिला दिनाच्या निमित्ताने विशेष सन्मान करण्यात आला.
आपल्या पतीला साथ देत सामाजिक हितासाठी बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचा हा सन्मान झाला आहे. बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी, स्विमर्स क्लब आणि अक्वेरियस क्लब यांच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात आला आहे.
या सत्काराबद्दल सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन तर्फे संबंधित संस्थांचे आभार मानण्यात आले आहेत.
भाग्यश्री सुरेंद्र अनगोळकर यांचा विशेष सन्मान
