कॅम्पमधील हाजीपीर रस्त्यावर जुगार
खेळणाऱ्या चौघांना अटक करुन त्यांच्याकडून १,६८० रुपये जप्त करण्यात आले. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली. हाजीपीर रोडवर जुगार सुरु असल्याची माहिती कॅम्पच्या उपनिरीक्षक रुक्मिणी ए. यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता चौघेजण रंगेहाथ सापडले. यामध्ये मंगेश बाबू डवाळे, राम देवानाथ लाखे, यमराज सुंदर लाखे व अजय अर्जुन लाखे (सर्वजण रा. शिवाजीनगर व ज्योतीनगर, गणेशपूर) या संशयितांचा समावेश आहे. या सर्वांकडून उपरोक्त रक्कम तसेच पत्ते जप्त केले. चौघांवर कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे
जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक
