कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील पट्टीहाळ केएस येथे नुकतीच उघडकीस आली. केंचाप्पा यल्लाप्पा सिंगमण्णावर (वय ५६) असे मृताचे नाव आहे. साडेदहा लाख रुपयांच्या कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद बैलहोंगल पोलिसांत झाली आहे. केंचाप्पा यांनी विविध सहकारी संस्था व हातउसने असे सात लाखांचे कर्ज शेतीकामासाठी घेतले होते. शिवाय साडेतीन लाख रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. हे कर्ज परत करता न आल्याने त्यांनी आपल्या शेतातच गळफास घेऊन जीवन संपवले. कॅम्प पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे