बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक १९ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज)येथे होणार आहे.
एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यानी व कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी,मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष आर एम चौगुले, सरचिटणीस अँड एम जी पाटील यांनी केले आहे.