जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी एम टेक कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
सुजाता दोडमनी हीने व्ही टी यु ला प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले.अभिषेक नलतवाड आणि अक्षय पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. ऐश्वर्या अलुर हिने चौथा तर मेघा ,पूजा नायकर आणि प्रसाद बोगार हे पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले. रोहन दीक्षितने सहावा क्रमांक मिळवला.अक्षता चव्हाण आणि उषा बागडी यांनी सातवा क्रमांक पटकावला.वल्लभ कुलकर्णी आठव्या क्रमांकाचा मानकरी ठरला. प्रथम क्रमांक मिळविलेल्या सुजाता दोडमनी या पोलीस निरीक्षक कुबेर रायमाने यांच्या भाची आहेत.