3-4 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका जोडप्याला स्वतःचे मूल होऊ शकत नाही हे कळल्यावर ते निराश झाले . आपल्या शारीरिक दोषांमुळे समाजाला मुख्यत: आपले नातेवाईक, मित्र, सहकारी यांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली .तसेच पुढे कसे या परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची काळजी वाटत होती.
यावेळी टेस्ट ट्युब बेबी पद्धतीने स्वतःचे बाळ जन्माला घालता येईल, असे कळल्यावर त्यांच्या मनात आशेचा किरण होता. मात्र, या पद्धतीचा खर्च परवडत नसल्याने त्यांची आशा फक्त काही दिवसापूर्ती टिकली
यावेळी निराश झालेल्या या जोडप्याने आपल्या हितचिंतकांचा सल्ला ऐकून अनाथ बाळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्यावर दिलासा मिळाला.
या छोट्या कथेवर आधारित, गणपत पाटील यांनी “गोपिका फिल्म प्रॉडक्शन” अंतर्गत लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.
25 ते 30 मिनिटांचा हा चित्रपट गणपत पाटील यांचा तिसरा चित्रपट आहे .जो झूम एक्स स्टुडिओमध्ये पोस्ट प्रॉडक्शन करण्यात आला आहे
दिनांक 19 मार्च 2022 रोजी यूट्यूब चॅनल आणि “जी नंबर 1 वर्ल्ड एंटरटेनमेंट” मध्ये हा लघुचित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे .
सुधीर नाझरे यांनी या चित्रपटाचे संपादन केले आहे तर सुहास विगिरे यांनी कॅमेरामन आणि शैलेश रेडेकर यांनी संगीत तसेच चित्रपटाचे डबिंग केले.या चित्रपटात शादिक शेख, रीना कांबळे, उन्नती शर्मा आणि हेमलता यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत .