कर्नाटक सरकार नैतिक विज्ञान शिक्षणाचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व शाळांमध्ये भगवद्गीता लागू करण्याचा विचार करीत आहे आणि त्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे.मूल्य शिक्षण म्हणून गीता शिकवण्याच्या निर्णयावर आता सरकार भर देणार आहे.
गुजरात सरकारने गीता राज्यातील शालेय अभ्यासक्रमाचा भाग असेल, असे जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर, कर्नाटकातील अनेक मंत्र्यांचा याला पाठिंबा असल्याचे म्हटले जात आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी.सी.नागेश म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून नैतिक विज्ञान शिक्षण राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.
‘शाळांमध्ये नैतिक शिक्षण सुरू करण्याची मागणी होत आहे. नैतिक शिक्षणात भगवद्गीता, रामायण, महाभारत किंवा कुराणसारख्या इतर कोणत्याही पवित्र पुस्तकांचा समावेश असू शकतो आणि मूल्ये शिकविणारे बायबलही असेल.
मंत्री म्हणाले की, निर्णय घेण्यापूर्वी ते मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि शिक्षणतज्ञांशी या विषयावर चर्चा करतील.
नैतिक विज्ञान शिक्षणात कशाचा समावेश करावा, याचा निर्णय तज्ज्ञांना घेऊ द्या,’ असे ते म्हणाले.
नागेश म्हणाले की,आपण शाळेत असताना आठवड्यातून एकदा तरी नैतिक शिक्षणावर क्लास असायचा.
“गुजरात सरकारने हे दोन किंवा तीन टप्प्यात सुरू करण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात ते भगवद्गीता आणत आहेत,” असे नागेश म्हणाले.