बेळगांव तालुक्यातील शक्तीपीठ व उचगांव गावचे आराध्यदैवत “श्री मळेकरणी देवी” सप्ताहाचा दुसरा दिवस सकाळी ठीक ६:३० वाजता महाआरती करून संपन्न झाला .प्रारंभी मंदिरात सर्व धार्मिक विधी करण्यात आले .
यावेळी आरतीचा मान बीजेपी ग्रामीणचे माजी अध्यक्ष विनय कदम यांना देऊन त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली .तसेच त्यांचा याप्रसंगी सत्कार देखील करण्यात आला
यावेळी मण्णुर गावचे भारतीय जनता पार्टी बेळगांव ग्रामीणचे माजी अध्यक्ष व तालुका एपीएमसी सदस्य श्री विनय विलास कदम, कुद्रेमनी चेअरमन संजय पाटील, बेळगांव तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष परशराम तुप्पट, मराठा समाजाचे नेते नारायण झंगरूचे,मण्णुर देवस्की पंच व्हाइस चेअरमन श्री उमेश चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सांब्रेकर,लहान कंग्राळी गौड मनोहर पाटील, तुरमुरीचे विनायक गोजेकर, पवन देसाई,बंडू पाटील,पत्रकार एन ओ चौगुले, अशोक चौगुले, एल डी चौगुले, बाळ देसाई व ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने महाआरतीला उपस्थित होते.*