बेळगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांच्या सानिध्यात येत्या 15 मे 2022 रोजी बेळगाव येथे भव्य गुरुवंदना समारंभ होणार आहे.
त्याअनुषंगाने मराठा समाजातील प्रमुखांनी कलादिग्दर्शक व निर्माते नितिन चंद्रकांत देसाई यांची एन. डी. स्टुडिओमध्ये भेट घेऊन श्री. किरण जाधव यांनी त्यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने सत्कार केला. दरम्यान, नितीन देसाई यांनी संपूर्ण गुरुवंदना समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मंचासंदर्भात चर्चा केली.
तसेच बेळगाव परिसरातील मराठा समाजातील नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सकल मराठा समाजाचे योगी बिरादार, सागर पाटील, अक्षय साळवी, चेतन नंदगडकर, विशाल कंग्राळकर आदी उपस्थित होते