कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या नसल्याने सण उत्सव मिरवणूका जयंती यांच्यावरचे निर्बंध काढण्यात आले आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे साजरी होणारी थोर महापुरुषांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या भागिरथ जयंती बसवेश्वर जयंती शंकराचार्य जयंती बेळवडी मल्लमा जयंती यांच्या पूर्वतयारी संदर्भात चर्चा करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या बैठकीत दरवर्षी प्रमाणे सर्व मिरवणुका कलाकारांचे वाद्यसंगीत चित्ररथ महाप्रसाद करण्यात येणार असल्याची चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगावचे जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ होते.
दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या सर्व जयंतीना त्यांनी यावेळी बैठकीत हिरवा कंदिल दाखविण्यात आला .तसेच मिरवणूक काढण्यास हे परवानगी दिली. दिनांक तीन मे रोजी बसवेश्वर जयंती आठ मे रोजी भागिरथ जयंती 10 मे रोजी बेळवडी मल्लमा जयंती साजरी करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा केली
यावेळी उपजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी पोलीस आयुक्त डॉक्टर राघवेंद्र गडादी समाज कल्याण विभाग अधिकारी डॉक्टर उमा सालीगौडर यांच्यासह सर्व समाजाचे नेते मंडळी उपस्थित होते.