चैत्र पौर्णिमेचा पाचव्या दिवशी येथील नेहरू नगर मध्ये नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान च्या वतीने ज्योतिबा देवाला आंबील घुगऱ्या चा नैवेद्य दाखविण्यात आला . त्यानंतर आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता जोतिबा देवाची पालखी आणि बैलगाड्या वाजत गाजत ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली येथे मार्गस्थ झाल्या. यावेळी चन्नम्मा सर्कल येथून ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत जोतिबा देवाच्या पालखीची आणि बैलगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर काकतीवेस रोड कंग्राळी गल्ली गोंधळी गल्ली समादेवी गल्ली नार्वेकर गल्ली या मार्गे ज्योतिबा देवाची पालखी मार्गस्थ झाली. यावेळी आयोजित केलेल्या मार्गावर सुवासिनीनी पालखीची ओवाळणी काढली.