शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन टिळकवाडी येथील एस केई संस्थेचा राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 : शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल या विषयावर येत्या 23 एप्रिल रोजी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित आयोजित करण्यात आले असून राणी चन्नम्मा विश्व विद्यालयाचे उप कुलपती डॉक्टर रामचंद्रगौडा यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे.
तसेच या चर्चासत्राला विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार असून या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी एस के ई संस्थेचे चेअरमन किरण ठाकूर असणार आहेत. तसेच विश्व विद्यालय अनुदान आयोग यूजीसीच्या अधिकारी डॉक्टर लता केसी यांचे विशेष मार्गदर्शन या चर्चासत्रात सर्वांना लाभणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण नीती 2020मध्ये चे बदल शिक्षण क्षेत्रात होत आहेत किंवा अपेक्षित आहेत त्याबद्दल विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी इंग्रजी मराठी कन्नड व हिंदी भाषेत आपले शोधनिबंध सादर करणार आहे.या चर्चासत्रात इतर महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात .त्यामुळे इच्छुकांनी 944 97 3286 या नंबर वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.