गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसाने झाडे झाड्याच्या फांद्यां पडून नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याकरिता शहरातील जीर्ण झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांनी स्वतः झाडे तोडण्यास पुढाकार घेतल्याचे काल दिसून आले .
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन शहरातील जीर्ण अवस्थेतील झाडे काढण्यास मंजुरी मिळाली आहे. शहरात होणाऱ्या अधून-मधून पावसाने तसेच सुसाट सुटणाऱ्या वाऱ्यामुळे जीर्ण झालेली झाडे रस्त्यावर कोसळून घरांचे झाडांचे आणि इतर नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे
त्यामुळे या घटनेत आणखीन वाढ होऊ नये याकरिता जीर्ण झालेले झाडे काढण्याची परवानगी मिळाली आहे .त्यामुळे संभाव्य धोका लक्षत घेऊन काल शहरातील झाडे तोडण्यात आली .तसेच येथील क्लब रोड एक्साईज ऑफीस रोड मिलिटरी महादेव मंदिर रोड बीएसएनएल ऑफिस मेन गेट येथील झाडे काढण्याची परवानगी मिळाली आहे.