बेळगाव शहरातील संस्कृती एज्युकेअरतर्फे येत्या रविवार दि. 1 मे 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता ‘द हॅप्पी माईंड’ हा मानसिक आरोग्यावरील परिसंवादाचा मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संस्कृती एज्युकेअरच्या देशमुख रोड, टिळकवाडी येथील कार्यालयामध्ये सदर परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्य आणि मानसिकता याचे महत्व विषद केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे भावनिक आणि मानसिक त्रासावर कशी मात करायची याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून सकारात्मक जीवनशैलीचे फायदे सांगितले जाणार आहेत. तरी नागरिकांनी या मोफत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
तसेच अधिक माहितीसाठी 9916835550 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्कृती एज्युकेअरचे सल्लागार तेजस कोळेकर यांनी केले आहे.