येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात चांगळेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काही कुस्त्या पावसामुळे रद्द करण्यात आल्या. मात्र या आधी झालेल्या कुस्तीच्या सामन्यात मल्लांनी एक मेकांना चितपट करत मैदान मारले.
यावेळी कुस्ती आखाड्याचे पूजन माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी जीवन संघर्ष फौंडेशनचे संस्थापक आणि कन्नड मराठी चित्रपट निर्माते व अभिनेता डॉ गणपत पाटील ,ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी दहा क्रमांकाच्या कुस्तीत आकाश घाडी यांनी निलेश पवार सांगली याला घिसाडावावर चीतपट करून मानाची गदा पटकावली.
तर अकरा नंबरच्या कुस्तीत नाथा पवार सांगली यांनी सौरभ पाटील याला चितपट केले. त्यानंतर अनेक कुस्त्या झाल्या मात्र 13 कुस्त्या शिल्लक असतानाच पावसाने घातलेला धुमाकूळीने मैदान अर्धवट राहिले.
यावेळी पावसाआधी पार पडलेल्या कुस्तीत अण्णा यमगर चिन्मय उद्गिरकर प्रेम जाधव विश्वजीत माकणे रुपेश कुगजी करण खादरवाडी कुणाल येळ्ळूर अनंत पाटील वैभव येळ्ळूर ओम घाडी श्री घाडी श्रीनिवास कडोली ओमकार खेत्रे सत्यजित सपकाळ हे विजयी झाले.
तर दिग्गज मल्लांचे यावेळी हलगीच्या निनादात जल्लोषात स्वागत करण्यात आले मात्र त्यांच्या कुस्त्या न झाल्याने उपस्थितांना हाच त्यांच्या फक्त दर्शनावर समाधान मानावे लागले. प्रारंभी जस्सापट्टी गुरुप्रीत सिंग सिकंदर शेख माऊली जमदाडे प्रीती पाल फगवाडा कार्तिक काटे संतु गुजर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात नामवंत मल्ल आल्याने या आखाड्याची सर्वांनाच उत्सुकता होती मात्र जोराचा वारा आणि पडलेल्या मुसळधार पावसाने कुस्ती शौकिनांच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे महाराष्ट्र मैदानात होणाऱ्या मोठ्या कुस्त्या रद्द करण्यात आल्या.
यावेळी आमदार लखन जारकीहोळी, माजी महापौर शिवाजी सुंठकर सतीश पाटील किरण जाधव पृथ्वीसिंग गुरुवर्य परशुराम भाऊ नंदिहळ्ळी, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, जीवन संघर्ष फाऊंडेशन आणि बेळगाव केसरीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणपत पाटील यांनी कुस्ती आखाडयाला भेट दिली. तसेच उपस्थितांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आल्या याप्रसंगी हजारो नागरिकांचा जनसमुदाय येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात उपस्थित होता.